साईमत जळगाव प्रतिनिधी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ६३७७ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
लोक अदालतीत ५०९२ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत १२८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामाध्यमातुन एकुण रक्कम रुपये २८,८४,३९,६०२.०२/- वसुल करण्यात आले. दिनांक ०४ ते दि. ०८ सप्टेंबर २०२३ पर्यत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ७७० प्रकरण निकाली काढण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम. शेख यांचे विषेश मार्गदर्शन लाभले. उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांची उपस्थिती होती.
लोकअदालत मध्ये जिल्हा न्यायाधीश-१एस. एन. राजुरकर, जिल्हा वकिल संघांचे अध्यक्ष अॅड. केतन ढाके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. पी. सय्यद, जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. जी. काबरा, पॅनल न्यायाधीश म्हणून जिल्हा एस. आर. पवार, जे. जे. मोहिते, पी. पी. नायगांवकर, एन. जी. देशपांडे, पी. आर. वागडोळे, जे. एस. केळकर, वसीम ए. देशमुख आदी जिल्हा न्यायाधीश यांचे सहकार्य लाभले.
यशस्वितेसाठी लोकअभिरक्षक कार्यालय प्रमुख अॅड अब्दुल कादीर अॅड योगेश आर. गावंडे, अॅड सुनिल डी. पाटील, अॅड विजय आर. बारी, अँड जीवन एस. सपकाळे, अॅड मंजुळा के. मुंदडा, ॲड शितल बी. राठी, जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्र. प्रबंधक एम. जी. चंदनकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधिक्षक सुभाष एन. पाटील, लिपीक अविनाश कुळकर्णी, आर. के. पाटील, प्रमोद ठाकरे, गणेश निंबोळकर, हर्षल नेरपगारे, दिपशिखा साखला, जयश्री पाटील, प्रकाश काजळे, जावेद पटेल, समांतर विधी सहायक आर. के. साळुंखे, जितेंद्र भोळे, सचिन पवार आदिंनी परीश्रम घेतले.