साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील अँग्लो उर्दु हायस्कुलमध्ये ईद-ए-मिलादनिमित्त ‘मुस्लिम रक्तवीर योद्धा ग्रुप’ आणि सुरभी ब्लड बँकेच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बिलाल खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रक्तदान शिबिराला फिरोज आयाज जागीरदार, सरफराज रफिक मण्यार, गुफरान नसीर मन्यार (बबलू भाई), सलीम खान शकूर खान, रमजान भिकन शहा, अजिज सायबू पिंजारी, अब्दुल वाहेद अब्दुल गफ्फार शेख, इमरान भाई आदी ‘मुस्लिम रक्तवीर योद्धा ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सहकार्य केले.
चाळीसगाव येथील ‘मुस्लिम रक्तवीर योद्धा ग्रुप’च्यावतीने सलग तिसऱ्यावर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. त्यात सलमान भाई एम. आय. एम., छोटू शेठ बेपारी, सरफराज मण्यार, रमीज खान अय्युब खान, राशिद भाई अफू गल्ली, अफरोज खान आदी रक्तदाते होते.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला आ. मंगेश चव्हाण, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पी. आय. संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जावेद हाफिज, नगरसेवक चिराग मेंबर, पत्रकार तनवीर शेख बद्रुद्दीन, पत्रकार मुराद पटेल, पत्रकार शरीफ मिर्झा, अग्गा भाई सय्यद, शेर अली फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पठाण (पुणे), पत्रकार गफ्फार मलिक, पत्रकार जाकीर मिर्झा, छोटू शेठ, हुसनोद्दीन जनाब, सोनू शहा, दाऊद भाई, तमिज बेग मिर्झा, नावेद सर, अकील मेंबर, आदिल चाऊस, वसीम टेलर, इमरान पैलवान, अमन पटेल, समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.