साडे बारा कोटींहून अधिक रकमेची वसुली
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार शनिवारी, १० मे रोजी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. त्यात जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालये व जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या प्रकरणांचा समावेश होता. लोक अदालतीत दाखलपूर्व आणि न्यायालयीन अशा चार हजार ५२१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. लोक अदालतीत तीन हजार ८२८ दाखलपूर्व तर ६९३ प्रलंबित प्रकरणे होती. त्यातून १२ कोटी ५० लाख ५१ हजार ९२६.५० रुपये इतकी मोठी रक्कम वसूल केली आहे. याशिवाय ५ मे ते ९ मे दरम्यान राबविलेल्या स्पेशल ड्राईव्ह अंतर्गतही २७० प्रकरणे निकाली काढली आहेत.
यांनी घेतला सहभाग
लोक अदालतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एमक्युएस एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी यांच्यासह दोन्ही पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. लोक अदालतीत बी. एस. वावरे (जिल्हा न्यायाधीश-२), एस. जी. काबरा (जिल्हा सरकारी अभियोक्ता), ॲड. सुनील जी. चोरडिया, छाया सपके, एस. पी. सय्यद, ॲड. रमाकांत पाटील, ॲड. अनिल पाटील, ॲड. कल्याण पाटील यांची उपस्थिती होती. यासाठी विविध न्यायालयांचे पॅनल न्यायाधीश, अधिकाऱ्यांचेही योगदान मिळाले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक जे. ओ. माळी त्यांच्या टीममधील आर. के. पाटील, प्रमोद ठाकरे, जयश्री पाटील, संतोष तायडे, सागर चौधरी, पवन पाटील, आकाश थोरात, राहुल साळुंखे, प्रकाश काजळे, जावेद पटेल, सचिन पवार, जितेंद्र भोळे यांनी परिश्रम घेतले.
