धरणगावात उपजिल्हा रुग्णालयासाठी ४० कोटींची प्रशासकीय मान्यता

0
43

साईमत, धरणगाव/जळगाव : प्रतिनिधी

धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड केलेल्या ठिकाणी आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी, यासाठी उपजिल्हा रूग्णालय उभारले जावे, यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून पालकमंत्री एवढ्यावरच न थांबता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामाच्या ४० कोटींच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यांना मान्यता मिळाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या मान्यतेसाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करून धरणगाववासीयांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.

धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने नुकतीच मंजुरी मिळाली होती. उपजिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी रुपये ३९ कोटी ४६ लक्ष ७५ हजार इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आभार व्यक्त केले आहेत.

असे असेल उपजिल्हा रुग्णालय

अंदाजपत्रकामध्ये इमारतीचे बांधकाम +२ असून निवासस्थान (टाईप-१) +३, निवासस्थान (टाईप-२) +३. निवासस्थान (टाईप ३) +७, निवासस्थान (टाईप-४) +४ आहे. इमारतीचे क्षेत्रफळ ८०२३.८५ चौ.मी. इतके आहे. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक, उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक व जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी प्रमाणित केल्यानुसार ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, येथील मुख्य रुपये ३९ कोटी ४६ लक्ष ७५ हजार इतक्या रकमेच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

अश्‍या असतील सुविधा

बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरात होणाऱ्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतरुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसुतीग्रुह, शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका), नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण, न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडून मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्त पुरवठा केंद्राद्वारे रुग्णांना उपचार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here