चाळीसगावला शहीद दिनानिमित्त ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
42

पोलीस स्टेशनमधील पोलिसांचा शिबिरात उत्स्फूर्त सहभाग

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, सायकलिंग ग्रुप, जॉगिंग असोसिएशन व क्रिकेट क्लबतर्फे शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिबिरात ४० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. चाळीसगावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गरजूंना लवकर रक्त उपलब्ध होत नाही. साठा पुरेसा उपलब्ध होत नाही, त्याच अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना खऱ्या अर्थाने आदरांजली मिळावी, म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात चाळीसगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख प्रितेश कटारिया, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, दत्ता भदाणे, अशोक चौधरी, सोपान चौधरी, योगेश मांडोळे, लीलाधर पाटील व रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मालपुरे यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे सहकार्य लाभले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here