Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»चाळीसगावला कुस्तीप्रेमींना ४ लाखांची ‘रेसलिंग मॅट’ची भेट
    क्रीडा

    चाळीसगावला कुस्तीप्रेमींना ४ लाखांची ‘रेसलिंग मॅट’ची भेट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्याकडे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद आहे. मात्र, चाळीसगावला अत्याधुनिक ‘रेसलिंग मॅट’ उपलब्ध नसल्याने पहेलवानांची मोठी गैरसोय होत होती. चाळीसगावचे विद्यमान आ.मंगेश चव्हाण यांनी निवडणुकीपूर्वी चाळीसगाव शहरात ‘रेसलिंग मॅट’ देण्याचे आश्वासन दिले होते. शहरातील हनुमानवाडी स्थित जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला ४ लाखांची ‘रेसलिंग मॅट’ भेट दिली. जळगाव जिल्ह्यातील ही पहिली ‘रेसलिंग मॅट’ असून तिचे नुकतेच उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने तसेच आता मॅटच्या कुस्तीसाठीचे सराव करणे सोपे होणार असल्याने सर्व चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

    उद्घाटनाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेचे पदाधिकारी मनोहरदास बैरागी पहेलवान, दीपक शुक्ला, अण्णा कोळी, अण्णा गवळी, तमाल देशमुख, किरण देशमुख, सतीश पवार, सुधाकर पालवे, माजी नगरसेवक नितीन पाटील, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, बबन पवार, आबा पोलीस, जितेंद्र वाघ, संभाजी घुले, कुणाल कुमावत, राहुल पाटील, सचिन दायमा, बंडू पगार, भरत गावडे, संभा पाटील, पिंटू पाटील, रवींद्र शुक्ल यांच्यासह तालुकाभरातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

    बोलून नाही तर करून दाखविणार : आ.मंगेश चव्हाण

    मी बोलून नाही तर काम करून दाखविणारा कार्यकर्ता आहे. चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीचे संवर्धन करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे, असे मी समजतो. त्यामुळे कुठल्याही शासकीय निधीचे आश्वासन न देता एक कर्तव्य म्हणून ४ लाखांची रेसलिंग मॅट जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला उपलब्ध करून दिली. त्याचा तालुक्यातील सर्व मल्लांनी लाभ घ्यावा. पहेलवान विजय चौधरी यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर चाळीसगावचे नाव उंचवावे, आगामी काळातही कुस्तीसाठी जे काही करता येईल, ती सर्व मदत करेन, अशी प्रतिक्रिया आ. मंगेश.चव्हाण यांनी दिली.

    कुस्तीगिरांसाठी आ.मंगेश चव्हाण ठरले ‘देवदूत‘

    गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पहिली रेसलिंग मॅट चाळीसगावमध्ये बसली आहेे. त्यामुळे सर्व कुस्तीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. खऱ्या अर्थाने आ.मंगेश चव्हाण कुस्तीगिरांसाठी ‘देवदूत’ ठरले असल्याची भावना जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेचे पहेलवान मनोहर बैरागी यांनी व्यक्त केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.