332 Brothers And Sisters : जळगावात शासकीय रुग्णालयातील ३३२ ब्रदर, सिस्टर १९ जुलैपासून बेमुदत संपावर

0
13

विविध मागण्यांसाठी आता घेतला तीव्र आंदोलनाचा पवित्रा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी, १९ रोजीपासून सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सर्व परिचर्या संवर्गातील स्त्री-पुरुषांनी (सिस्टर, ब्रदर) हे बेमुदत संपावर जाणार आहे. वरिष्ठ पातळीवर कुठलाही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे अखेर संघटनेला हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने गेल्या ६ जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित केला. त्याला राज्यभरातून कडाडून विरोध करुन शासन निर्णय रद्द केला. राज्यात वाढत्या लोकसंख्येनुसार १०० टक्के पद निर्मिती करणे, १०० टक्के पदोन्नतीसाठी संघटना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने परिचारिका संवर्गात संताप व्यक्त केला जात आहे. आता ३३२ कर्मचारी हे १९ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (शासन मान्य) शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अध्यक्ष रुपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी, खजिनदार अक्षय सपकाळे आदी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here