जळगाव, प्रतिनिधी । युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या पुढाकाराने युवासेना जळगाव महानगर व मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जळगाव शहर महानगरपालिका यांच्या सहकार्याने मूळजी जेठा महाविद्यालय येथे दि 5 जानेवारी ते 7 जानेवारी 2022 दरम्यान 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीराचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. महापौर सौ. जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय भारंबे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले व युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, मू. जे. महाविद्यालयाचे कुलसचिव जगदीप बोरसे, युवासेना महानगर युवाधिकारी विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, जळगाव शहर महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबीराच्या पहिल्या दिवशी 935 विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. येणाऱ्या तिन दिवसात सुमारे मूळजी जेठा महाविद्यालयाचे सुमारे 5000 विद्यार्थ्यांचे लसीकरण युवासेने मार्फत करून घेण्यात येणार आहे.
“पुढील 30 दिवसात जळगाव शहरातील प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण शिबीराचे आयोजन करून 15 ते 18 वयोगटातील 30 हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याचे युवासेनेचे मानस” केले असल्याचे युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया यांनी सांगितले. याविषयी शहरातील प्रत्येक महाविद्यालयाशी युवासेनेचे पदाधिकारी जाऊन संपर्क साधणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक वैष्णवी खैरनार, जितेंद्र बारी, पियुष गांधी, यश सपकाळे, गिरीष सपकाळे, सागर हिवराळे, संकेत कापसे, अमित जगताप, प्रितम शिंदे, तेजस दुसाने, जय मेहता, अमोल मोरे, अंकित कासार, आर्यन सुरवाडे, चेतन कापसे, शंतनू नारखेडे, सयाजी जाधव, दिनेश पाटील, राहूल पोतदार, यांनी परिश्रम घेतले.
7 जानेवारी पर्यंत 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मू. जे. महाविद्यालय येथे सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत युवासेनेतर्फे लसीकरण सुरू राहणार आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना महानगर तर्फे करण्यात आले आहे