Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पिंप्राळ्यातील सेवानिवृत्त सहायक फौजदाराची ३ लाखात फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
    क्राईम

    पिंप्राळ्यातील सेवानिवृत्त सहायक फौजदाराची ३ लाखात फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    पिंप्राळा येथील सेवानिवृत्त सहायक फौ२जदाराला सोन्याचे कॉइन घेण्याचे आमिष दाखवत ३ लाखांची फसवणूक केल्याचीघटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीतील सेवानिवृत्त सहायक फौजदार पुरुषोत्तम सुपडू लोहार (वय ६३) हे पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्याकडे निवृत्तिवेतनाची रक्कम जमा होती. त्यावेळी मुंबई येथील भैय्या पाटील व कामता सोनी या नावाच्या दोन व्यक्तींनी लोहार यांच्याशी ओळख निर्माण केली. भैय्या पाटील यांनी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये बोलावून त्यांना गुंतवणुकीचे अमिष दाखविले. त्यानंतर त्यांना कंपनीत सोन्याचे कॉइन घेऊन कंपनीत गुंतवणूक करण्याचे सांगून एक आयडी दिला. त्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळेल, असे सांगण्त आले. त्यानंतर वेळोवेळी ३ लाख १ हजार रुपये त्यांच्याकडून दोघांनी घेतले. परंतु लोहार यांना फायदा मात्र दमडीचाही झाला नाही. तसेच भरलेली मूळ रक्कम मागून देखील परत मिळाली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त सहायक फौजदार लोहार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भैय्या पाटील व कामता सोनी या दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.