हतनूर धरणातून होतोय दररोज 25 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

0
5

हतनूर धरणातून होतोय दररोज
25 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

जळगाव (प्रतिनिधी) –

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. तापमानाचा परिणाम धरणाच्या जलसाठ्यावर होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे हतनूर धरणातून दररोज 25 दलघमी बाष्पीभवन होत आहे. हतनूर धरणात गतवर्षीपेक्षा यंदा २.०३ टक्के साठा कमी आहे. गतवषर्षापेक्षा तो कमी असला तरी उन्हाळ्यात हतनूरवर अवलंबून असलेल्या गावांना टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तालुक्यातील हातनुर धरण हे भुसावळ शहरासह विभागातील ११० गावे, औद्योगिक प्रकल्प, नगरपालिका क्षेत्रांची तहान भागवते. या धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती अवलंबून आहे शेतीदेखील धरणावरच अवलंबून आहे.

हतनूर धरणातून यंदा सिंचनासाठी चार, तर व बिगर सिंचनासाठी दोन आवर्तने देण्यात आली. हतनूर धरणाच्या 10 मार्चरोजी पाण्याची पातळी 212.550, साठा 306.50 जिवंत साठा 173.50, टक्केवारी 68.4 अशी आहे. 2024 मध्ये हतनूर धरणाचे 10 मार्च 2024 रोजी २१२.६९० साठा 312.60 जिवंत साठा 179.60 व टक्केवारी 70.43 होती. गतवर्षीच्या तुलनेत गेल्या पावसाळ्यात धरणात जास्त पाण्याची आवक झाली.

गेल्या वर्षीपेक्षा पाणी पातळी 0.14 मिलिमीटरने कमी होता. साठा 6.1 ने जिवंत साठा पण 6.1 ने तर टक्केवारी 2.39 ने कमी यावर्षी आहे.2025 मध्ये 1 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये पाण्याचे बाष्पीभवन 25 ते 26 दलघमी होत आहे. हेच बाष्पीभवन बुधवार, दि. 5 मार्चला 22 दलघमी झालेले आहे. बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात नैसर्गिक घट सहन करावी लागत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here