साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात २० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. गेल्या दोन वर्षांपासून रोटरी वेस्टतर्फे दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. गतवर्षी ३० दिवसात ६० शिबिरांद्वारे १२०० पेक्षा अधिक रक्त पिशव्यांचे रोटरी वेस्टने महारक्तदान अभियानात संकलन केले होते.
शिबिराचा शुभारंभ डॉ.राजेश पाटील, विनोद बियाणी, अरुण नंदर्षी, ॲड.सुरज जहांगीर, संगीता पाटील, चंद्रकांत सतरा, सुनील सुखवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
रोटरी वेस्टचे अध्यक्ष सरीता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी, ब्लड डोनेशन कमिटी व प्रोजेक्ट चेअरमन हितेश मंडोरा, को- चेअरमन मयूर धुप्पड यांनी शिबिराचे नियोजन व संचालन केले. यावेळी रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष अरुण नंदर्षी यांना ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गौरविण्यात आले. शिबिराला डॉ.केतकी पाटील, शंतनू अग्रवाल, अतुल कोगटा, डॉ.कल्पेश गांधी, महेश सोनी, प्रा.डॉ.तनुजा महाजन, राधा कोल्हे, प्रेमलता सिंग, अमित मुथा, संदीप भोळे आदी उपस्थित होते.
