यशस्वी विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते गौरव
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
गेल्या फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेरचे तब्बल १५ विद्यार्थी तर पूर्व प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे दोन विद्यार्थी असे १७ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी समिती प्रमुख ललित लामखेडे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकांसह शिक्षक उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती मिळविणारे विद्यार्थी असलेल्या जामनेरातील न्यू इंग्लिश स्कूल ही जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीच्या परीक्षेत आठवीचा विद्यार्थी ऋग्वेद श्रीपाद पेडगावकर हा तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात गुणवत्ता यादीत तिसरा आला आहे. तसेच जिल्ह्यात यश अनिल डोंगरे चौथा, जयराज ईश्वर पाटील २९वा, निशा गजानन पाटील ३६ वी, ओम राजेंद्र कोळी ५५वा, मीनल राजेंद्र साळवे ८५ वी, सोनल मनोज भामरे १०८, प्राची प्रवीण पाटील ११५, अनघा उमाकांत तांडे १३६, सोनाक्षी उमेश पाटील १२७, सृष्टी नंदू शेळके १३८, रेणुका नरेंद्र जोशी १५०, नीलिमा रामेश्वर शिसोदे १९१, निकिता प्रवीण पाटील १९५, यशश्री हितेंद्र जाधव १९७ वी तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीतील दक्ष महेश महाजन २४३ तर दर्शन किरण काकर २५४ असे दोघेही विद्यार्थी जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत झळकले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना समिती प्रमुख ललित लामखेडे, के.के.पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
यांनी केले कौतुक
अशा यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक आणि समिती प्रमुख अशा सर्वांचे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र बाबुराव पाटील, सचिव जितेंद्र रमेश पाटील तसेच सर्व संचालक मंडळ, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस.पी.महाजन, पर्यवेक्षक एस.ए.सुरवाडे, पी.एस. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
