दोन वेगवेगळ्या अपघातात १७ जण जखमी

0
19

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

येथील राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात १७ जण जखमी त्यापैकी पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी घडली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर येथील निवडणूक आटोपल्यानंतर गृहरक्षकांना घेवून निघालेली बस (क्र.एम.एच. १४ बी.पी. ३८८२) अकोलाकडे जात असतांना २१ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ ओव्हरब्रिजवरील दुभाजकाला धडकली. अपघातात बस चालकासह १४ जण जखमी झाले. त्यापैकी गोपाल जाधव (वय २८, रा. जवळा बु.) आणि संतोष दामोदर गणोजे (वय ४२, रा. कोळंबी, मुर्तीजापूर) या दोघांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले. उर्वरित १२ जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी बसचालक दीपक भाऊराव मडावी (वय ४९, रा. यवतमाळ) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या अपघातात तीन जखमी

दुसरा अपघात हा बुधवारी, २२ मे रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडला. राष्ट्रीय महामार्गावरील दख्खन ऑटो सर्व्हिस सेंटरजवळ जी.जे. १८/ बी.टी. ८५३८ क्रमांकाचा ट्रक आणि एन.एल.०१ /ए.एफ.६७०१ क्रमांकाच्या कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही वाहनातील मोहम्मद इकरार मोहम्मद जुबेर (वय ३८, रा. अहमदाबाद), मोहम्मद सादीक मोहम्मद नफीस (वय ४२, इलाहाबाद) आणि अजय अमरसिंह वासकले (वय २१, रा. सेेंधवा, मध्यप्रदेश) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना बुलढाणा येथे रेफर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here