जामनेर पोलिसांकडून नाकाबंदीवेळी १७ लाखांची रोकड जप्त

0
60

बोदवड रोडवरील वाहनाची घेतली झाडाझडती

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये जामनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने व सुरक्षा बलाचे जवान यांनी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम .एम. कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बोदवड रोड येथे नाकाबंदी करून वाहनांची झाडाझडती घेतली होती. तेव्हा त्यामध्ये एका वाहनातून १७ लाख २४ हजार ८०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्या वाहन धारकाचे नाव प्रकाश समाधान पाटील व पठाण (पूर्ण नाव माहीत नाही) यांची असून ते कपाशीचे व्यापारी असल्याचे सांगत आहेत.

गुजरातमध्ये कपाशी विकून रक्कम मिळाली, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांनी ही रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ताब्यात दिली आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here