पाचोरा लोकन्यायालयात १६० दिवाणी, फौजदारी प्रकरणे निकाली

0
4

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. लोकन्यायालयात पाचोरा न्यायालयात दाखल असलेली १६० दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघून १ कोटी ८१ लाख ३९ हजार ४५७ रुपयांची वसूली केली. तसेच ७७१ वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होवून ७५ लाख ४४ हजार ७८५ रुपयांची वसूली झाली, अशी पाचोरा न्यायालयात ९३१ प्रकरणामध्ये २ कोटी ५६ लाख ८४ हजार २४२ रुपयांची वसूली करण्यात आली. लोकन्यायालयात २ दिवाणी प्रकरणे व्हरच्युअली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाली काढण्यात आले.

कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती पाचोऱ्याचे अध्यक्ष तथा न्यायिक अधिकारी दिवाणी न्यायाधीश जी.बी.औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एम. जी हिवराळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश एल.व्ही.श्रीखंड तसेच पंच सदस्य विधीज्ञ भाग्यश्री रामचंद्र मराठे, वकील संघाचे अध्यक्ष विधीज्ञ प्रवीण पाटील, उपाध्यक्ष मंगेश गायकवाड, सचिव राजेंद्र पाटील, सरकारी अभियोक्ता आर.के.माने तसेच ज्येष्ठ विधीज्ञ मंडळी व न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यापुढे होणााऱ्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवा व लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आव्हान तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी.बी.औंधकर यांनी केले.

पती-पत्नीचे ‘मनोमिलन’

चार वर्षांपासून विभक्त असलेल्या एका कौटुंबिक वाद प्रकरणात लोकन्यायालयात मनोमिलन करण्यात पंच यशस्वी झाले. त्यामुळे हे विभक्त असलेले दाम्पत्य एकत्र राहण्यास तयार झाले. यावेळी सासरच्यां मंडळींनी सुनेस मुलीसारखे सांभाळावे, अशी समज न्यायाधीश औंधकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here