15 वर्षांपासून बंद असणाऱ्या गाळ्यात सापडला मानवी अवयव

0
48

नाशिक ः प्रतिनिधी

शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. केमिकल प्रक्रिया करून मानवी अवयव ठेवल्याचे उघड झाले आहे.15 वर्षांपासून गाळा बंद असल्याचा दावा गाळा मालकाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
नाशिकमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बिल्डिंगमधल्या बंंद गाळ्यामध्ये मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंंबई नाका पोलीस स्टेशन लगतही बिल्डींग आहे. याठिकाणी एका बादलीमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी कान, नाक असे अवयव ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहेत.
घटनास्थळी फॉरेन्सिक डॉक्टरांची टीम दाखल होऊन अवयव तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी गाळेधारकाकडे विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले.जवळपास पंधरा वर्षापासून गाळे बंद असल्याचा गाळा मालकाने दावा केला आहे. गाळा मालकाच्या म्हणण्यानुसार पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या गाळ्यामध्ये राहत होते. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here