साईमत, बोदवड : प्रतिनिधी
आगामी हिवाळी अधिवेशनात व्हाईस ऑफ मीडियाच्या नुकत्याच झालेल्या बारामती अधिवेशनात संमत केलेल्या १४ ठरावांवर निर्णय घेण्यासंदर्भात बुधवारी, ६ डिसेंबर रोजी बोदवड तालुका व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष संदीप वैष्णव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुक्ताईनगर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
हिवाळी अधिवेशनात सर्व विषयांवर शासनाने लवकर दखल घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन आ.चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. निवेदन देतांना व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष संदीप वैष्णव, सचिव अमोल आमोदकर, उपाध्यक्ष निवृत्ती ढोले, सुहास बारी, रवींद्र मराठे आदी उपस्थित होते.
यावेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी भाईसाब मीडियाचे तालुकाध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांना येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपल्या निवेदनाचा योग्य तो विचार करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.