Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्ह्यातील १४ नगरपालिकांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा
    जळगाव

    जिल्ह्यातील १४ नगरपालिकांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा

    SaimatBy SaimatJanuary 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेचे निकाल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत मागील वर्षापेक्षा यावर्षी सुधारणा झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण निकालात जिल्ह्यातील १४ नगरपालिकांना ओडीएफ प्लस प्लस Open Defecation Free (ODF) चा दर्जा मिळाला आहे.

    ओडीएफ म्हणजे ही शहरे उघड्यावरील शौचालयापासून मुक्त आहेत‌. ओडीएफ प्लस म्हणजे ही शहरे फक्त उघड्यावरील शौचालयापासून मुक्त नसून या शहरात स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह पण आहेत. ओडीएफ प्लस प्लस म्हणजे या शहरांमध्ये FSTP- एफएसटीपी (फेकल स्लज ट्रीटमेंट प्लांट) मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित आहेत.याठिकाणी सांडपाण्यावर नियमित प्रक्रिया केली जाते.
    जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा, सावदा, यावल, पारोळा, रावेर व वरणगाव या नगरपालिकांना ओडईएफ प्लस प्लसचा दर्जा मिळाला आहे.‌अशी माहिती सहायक आयुक्त (नगरपालिका)‌ जनार्दन पवार यांनी दिली आहे.
    “स्वच्छता सर्वेक्षण कामगिरीत सुधारणा झाली आहे. पुढील वर्षी नगरपालिकांच्या कामगिरीत अजून सुधारणा होण्यासाठी निकालाचे नगरपालिकानिहाय विश्लेषण केले जाईल. यानुसार सखोल नियोजन आराखडा तयार करून आवश्यक निधी व मनुष्यबळ प्रत्येक नगरपालिकेला उपलब्ध करून दिले जाई‌ल.एक वर्ष प्रचंड मेहनत घेऊन पुढील वर्षी चांगला निकाल लागेल,‌यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.” अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

    नगरपालिकांमध्ये पायभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे‌.नागरिकांनी ही स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा‌. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नगरपालिकांमध्ये झालेल्या सुधारणांसाठी नागरिक, सफाई कामगार व मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन ही त्यांनी केले आहे‌.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.