साईमत, मुंबई ः प्रतिनिधी
आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर हे पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. ठाकरे गटाच्या १४ आमदारांपासून सुनावणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान मिळालेल्या एका खात्रीलायक माहितीनुसार दररोज एका आमदाराची सुनावणी घेतली जाणार आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांच्याकडे सुरूवातीला सादर केले. त्यामुळे आधी त्यांची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकूण घेणार आहेत.
शिंदेच्या आमदारांना मुदतवाढ
मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांच्या शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. यासंदर्भात त्यांना उत्तर दाखल करायचे होते, तसे पत्र विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले होते. विशेष म्हणजे अध्यक्षांनी ठाकरे आणि िंशदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात िंशदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्व्ोकर यांनी मुदत वाढ देण्याचा हा निर्णय घेतला.
अध्यक्ष काय निर्णय घेणार?
शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि राज्यात राजकीय सत्तासंघर्ष उद्भवला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे आता शिवसेनेतून बंड करत बाहेर पडलेले ते आमदार पात्र की, अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ोकर घेणार आहेत. कोणत्या गटाचे आमदार पात्र आणि कोणत्या गटाचे आमदार अपात्र? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्व्ोकर यांच्याकडे तर आहेच, मात्र कोणाचा गट हा खरा पक्ष आहे? हे ठरवण्याचे अधिकार देखील नार्व्ोकरांनाच आहेत.
क्रांतिकारी निर्णय घेईन – नार्व्ोकर
काही दिवसांपूर्वी मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असे वक्तव्य राहुल नार्व्ोकर यांनी केले होते. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असे सूचक वक्तव्य नार्व्ोकरांनी केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.