मुंबई : प्रतिनिधी
काल झालेल्या जोरदार पडझडीनंतर आज सकाळी भारतीय शेअर सावरलाय. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी काल निम्मं नुकसान भरुन काढलंय. निफ्टी सध्या जवळपास ४०० अंकांनी वधारलाय तर सेन्सेक्स सुद्धा जवळपास 1600 अंकांनी वर आलाय. कालच्या सगळ्याच दिग्गज कंपन्यांचे शेअर अगदी कमी किंमतीत उपलब्ध झाले होते.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1600 अंकांनी वाधारून 56165 अंकांवर पोहचला तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 400हून अधिक अंकांनी वाधारून 16735 अंकावर पोहचले. त्यामुळे आज सकाळीच गुंतवणूकदारांनी अक्षरशः झडप घालून शेअर्स विकत घेण्यास सुरुवात केलीय. रिलायन्स एसबीआय, आयसीआयसीआय, हिंडाल्को, टाटा स्टील, टीसीएस अशा बड्या कंपन्यांचे समभाग साधारण तीन टक्के वधारलेआहेत.