विज्ञान : धनश्री भोंबे, वाणिज्य : कोमल मुळे तर कला : पायल धानोई प्रथम
साईमत/जामनेर/प्रतिनिधी
येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात धनश्री विकास भोंबे ७१.६७ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे. तसेच कुमुद रविप्रकाश जयकारे ६०.८३ द्वितीय तर हर्षल नरेंद्र पाटील हा ६०.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात कोमल कमलाकर मुळे ७६.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय सोनाली गोपाळ गवळी ७४.६७ तर तृतीय क्रमांकाने जयश्री धनराज शेजोळ ६८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
कला शाखेचा ८९.३९ टक्के निकाल लागला आहे. पायल रणजित धानोई ७०.३३ टक्के मिळवून कला शाखेतून विद्यालयात प्रथम आली. तसेच प्रेम विनोद थाटे ६६.६७ द्वितीय, साक्षी रवी चिमणकर ६५.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. एकत्रित सर्व शाखांचा ९५.८३ टक्के निकाल लागला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे यांनी केले कौतुक
विद्यालयातून प्रथम आलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा मंत्री गिरीष महाजन, संस्थेच्या सचिव तथा माजी नगराध्यक्षा साधना महाजन, संस्थेचे संचालक ॲड.शिवाजी सोनार, के.बी.माळी, प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्ऱ्यांनी कौतुक केले आहे.