Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»भारत माता महिला पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
    जामनेर

    भारत माता महिला पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 30, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहुरला वार्षिक सभा उत्साहात, गुणवंतांचा गौरव

    साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :

    येथील विश्वासाला पात्र ठरलेली भारत माता महिला पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात घेण्यात आली. सभेत पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंगला पवार होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. संस्थेचे संचालक मंडळ, तज्ज्ञ सल्लागार मंडळ, उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्लन व प्रतिमा पूजन करण्यात आले. अहवाल वर्षात संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, देशभक्त, नेते मंडळी, पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, संत-महंत, कीर्तनकार मयत झाले असतील, अशा थोर व्यक्तींना सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    संस्थेमार्फत इतर महत्त्वपूर्ण गुणगौरव व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पाडण्यात आला. त्यात मानव हक्क संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल शंकर भामेरे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पहुर शहर उपाध्यक्षपदी ईश्वर हिवाळे यांची निवड झाल्याबद्दल, संतोष भडांगे यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळा स्तरावर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, अविनाश पवार यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, किशोर लहासे व भूषण द्राक्षे यांची आरोग्य सेवकपदी निवड झाल्याबद्दल, पंढरी बनकर यांची ठाणे जिल्हा पोलीसपदी निवड झाल्याबद्दल, सचिन काकडे व रमेश जाधव यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीसपदी निवड झाल्याबद्दल, वैभव थोरात यांची जळगाव पोलीसपदी निवड झाल्याबद्दल, हरिभाऊ राऊत यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, वासुदेव घोंगडे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल तसेच संपत कुमावत यांचे नातू आयुष कुमावत याची महाराष्ट्र क्रिकेट टी-ट्वेंटीमध्ये निवड झाल्याबद्दल अशा सर्वांना शाल, टोपी व मानचिन्ह देऊन संस्थेच्या संचालकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

    विद्यार्थ्यांचा मानचिन्ह भेटवस्तू देऊन सत्कार

    संस्थेमार्फत आर.टी.लेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पहुर, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, कन्या माध्यमिक विद्यालय या शाळेतील दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व पेन देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे व्यवस्थापक दीपक जाधव यांनी वार्षिक सभेचे कामकाज पाहिले. सभेत संस्थेची आर्थिक पत्रके व विविध ठराव वाचून दाखवण्यात आले.

    संस्थेने युवक, युवतींसाठी समुपदेशन कार्यक्रम घ्यावे

    यावेळी संस्थेचे हितचिंतक राजधर पांढरे, ज्येष्ठ पत्रकार शरद बेलपत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेने गावातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याच्या कार्यक्रमावर भर देण्यात यावा. तसेच विविध क्षेत्रात नोकरीवर असलेल्या, सामाजिक कार्यात काम करत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात यावा. तसेच महिलांसाठी संस्थेच्या वर्धापनदिनी हळदी कुंकूचा कार्यक्रम, आरोग्य विषयक कार्यक्रम, युवक व युवतींसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात यावे, असे सुचविण्यात आले.

    सभेला यांची होती उपस्थिती

    सभेसाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, समाधान पाटील, प्रदीप साखरे, शंकर घोंगडे, शंकर जाधव, दतु जाधव, दिनकर पवार, ज्ञानेश्वर लहासे, लक्ष्मण गोरे, बाबुराव आस्कर, अशोक जाधव, प्रभाकर पाटील, अमृत वानखेडे, भारत पाटील, संतोष भडांगे, डॉ.गोपाल वानखेडे, संस्थेचे संचालक व सभासद, हितचिंतक उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे तज्ज्ञ सल्लागार मधुकर पवार तर आभार संस्थेचे तज्ज्ञ सल्लागार मधुकर पवार यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.