वालझिरी तीर्थस्थानाच्या विकासासाठी १ कोटींचा भरघोस निधी

0
26

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

श्री क्षेत्र वालझिरी येथे १ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा खा.उन्मेश पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला. त्यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. भाविकांच्या विविध सोयीसुविधांसह परिसराचा कायापालट होणार आहे.

रामायणकार महर्षी वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेले तीर्थक्षेत्र वालझिरी परिसरात नव्हे तर देशात सुपरिचित आहे. या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. या भाविकांना अधिकाधिक सुखसुविधा मिळाव्यात, यासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पर्यटन निधीतून एक कोटी रुपये विकासासाठी उपलब्ध करून दिले आहे. या ऋषीभूमीची पर्यटन भूमीकडे वाटचाल अशीच सुरु रहावी, यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही खा.उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here