मुबई : प्रतिनिधी
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारत देशात आणण्याकरिता केंद्र सरकारने मोहिम राबवली आहे. या भागमध्ये, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन येणारे दुसरे विमान आज पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी येथील विमानतळावर युक्रेन मधील नागरिकांचे गुलाबाचे फुल देऊन यावेळी स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चेमध्ये भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीचा मुद्दा उपस्थित केला होता. या अगोदर बुखारेस्ट येथून २१९ लोकांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये आले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ऑपरेशन गंगा अंतर्गत बुखारेस्टमधून २५० भारतीयांना घेऊन येणारे दुसरे विमान रविवारी दिल्लीला पोहोचले आहे.
या २ उड्डाणावर आता बुडापेस्टहून तिसरे विमान देखील आज येण्याची शक्यता आहे. युक्रेन मधील भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या लोकांना शेजारी देशांमध्ये हलवताना अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनमध्ये सध्या सुमारे १६ हजार भारतीय अडकले आहेत. दिल्ली विमानतळावर भारतीय नागरिकांशी संवाद साधताना सिंधिया यांनी सांगितले आहे की, भारतात प्रत्येक नागरिक घरी परतला आहे. कृपया तुमच्या सर्व मित्रांना आणि सहयोगींना मेसेज पाठवा की आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांच्या सुरक्षित परतीची हमी देणार आहे.