१४ वर्षीय मुलाने केली आत्महत्या

0
31

जळगाव :प्रतिनिधी 

शहरातील इंद्रप्रस्थ नगरमध्ये नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रेम प्रवीण सोनवणे (वय १४, रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी प्रवीण सोनवणे पत्नी, मुलगा, मुलगी व आईसोबत इंद्रप्रस्थ नगरात राहतात. त्यांचा मुलगा प्रेम हा जळगावातील सेंट लॉरेन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत होता. प्रेमची गेल्या तीन दिवसांपासून परीक्षा सुरू होती. गुरुवारी त्याचा चौथा पेपर झाला. पेपर संपल्यानंतर सोनवणे हे त्याला दुपारी १२ वाजता शाळेतून घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर थकवा घालवण्यासाठी त्याला ज्यूस, ग्लुकॉन डी दिले. सुटी असल्यामुळे घरगुती कामे करण्यासाठी सोनवणे हे बाजारात गेले होते.
त्या वेळी घरात प्रेम, त्याची आई लहान बहीण असे होते. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सोनवणे यांना शेजाऱ्याने मोबाइलवर संपर्क साधत तातडीने घरी येण्यास सांगितले. ते दुचाकीवर घरी येत होते. त्या वेळी त्यांना रिक्षामधून नातेवाइकाने हात दिला. प्रेमला शेजारी व नातेवाईक रुग्णालयात घेऊन जात होते. त्या वेळी त्याने गळफास लावून घेतल्याची माहिती सोनवणे यांना मिळाली. त्याला लगतच्या खासगी डॉक्टरांना दाखवले. त्यांनी तातडीने रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्यानंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रेमने बेडरूममध्ये खुर्चीवर उशी ठेवून छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्या वेळी आई व बहीण समोरील खोलीत होत्या. प्रेमने आत्महत्या केल्याचे त्याच्या लहान बहिणीच्या निदर्शनास आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here