Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»शैक्षणिक»१२ वी पास विद्यार्थ्यांना मिळेल 81,000/- पर्यंत पगार
    शैक्षणिक

    १२ वी पास विद्यार्थ्यांना मिळेल 81,000/- पर्यंत पगार

    SaimatBy SaimatFebruary 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. सोबत जर बारावी पास असलेल्या असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळांत किंवा एथलॅटिक्स टूर्नामेन्टमध्ये राज्य किंवा देश पातळीवर ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, अशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्पोर्ट्स क्वोटामध्ये असलेल्या आणि बारावी पास झालेल्यांना सीआयएसएफ (CISF recruitment 2022) म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात हेड कॉन्स्टेबलपदासाठी नोकरीची संधी आहे. चला तर जाणून घेऊयात या नोकरीसाठी कसं, कुठे आणि कधीपर्यंत अप्लाय करता येऊ शकेल?
    केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात भरती केली जाणार आहे. या भरतीप्रकियेला सुरुवात झाली असून याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 31 मार्चपर्यंत उमेदवारांना सीआयएसएफमधील भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करता येतील. 249 पदांवर सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. cisf.gov.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येऊ शकेल.
    वय वर्ष 18 ते 23 असलेल्यांना या पदसाठी अर्ज करता येऊ शकेल. तसंच एससी आणि एसटीसाठी वयात पाच वर्षांची सूटही दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. तर ओबीसी वर्गासाठी उमेदवारांना ती वर्षांची सूट दिली जाणार आहे. वयोमर्यादेची पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सीआयएफच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विस्तृत माहिती मिळवता येऊ शकेल.
    संपूर्ण प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळाल्यास 25 हजारपासून ते 81 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना निवड प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. यासाठी इच्छुक उमेदावारांना 31 मार्चच्या अगोदर आपला अर्ज द्यावा लागणार आहे.
    दरम्यान, महिला आणि अनुसूचित जाती आणि जमातींमधील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही आहे. तर इतर सर्व वर्गातील उमेदावारांकडून 100 रुपये शुल्क अर्जासाठी आकारलं जाणार आहे.
    सीआयएसएफमध्ये भरती होण्यासाठी बारावी पास आणि स्पोर्ट्स कोटामध्ये प्रतिनिधित्व केलेलं असणं महत्त्वाचं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Group Discussion Program : विद्यापीठात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनासह गट चर्चा कार्यक्रम

    December 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.