पुणे प्रतिनिधी : समर्पित भावनेने तिन शतक निरंतर निरपेक्षपणे सामजिक,वैद्यकीय,शैक्षणीक,अध्यात्मिक,धार्मिक,अपंगसेवा पुनर्रवसन कार्ये,मूकबधिर मतिमंद सेवा,वृक्षारोपण ,ग्राम स्वछता कार्ये,व्यसनमुक्ती,प्रवचनद्वारे समाजप्रबोधन कार्ये ,राष्ट्रीय् सेवा योजना ,नेहरु युवा कार्ये,व्होकेसनल ट्रेनिंग कोर्सेस,नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना पान्डेमिक मधे महत्वपूर्ण लोक सेवा कार्ये इत्यादी क्षेत्रात निष्काम कर्मयोगी कार्ये केल्याबद्दल नुकताच भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.बंगलोर येथील राष्ट्रीय पातळीवर कार्य करनारया संस्थेच्या वतीने वरिल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.डॉ रविंद्र भोळे आरोग्यसेवा केन्द्रा उरुळीकांचन द्वारे डॉ रवींद्र भोळे अनेक वर्षपासुन अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा देत असुन डॉ मणीभाई देसाई मनवसेवा ट्रस्ट निती आयोग सल्ग्नीत दिल्ली संस्थेच्या वतीने विविध लोकसेवेचे उपक्रम राबवित आहेत.तसेच डॉ मनिभाई देसाई प्रतिस्ठान एन वाय के क्रिडा युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार सलग्नीत संस्थेच्या वतीने राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार ,सरदार वल्लभभाई राष्ट्ररत्न पुरस्कार देउन कार्यकर्त्याना स्फुर्ती देत आहेत.तसेच राज्यात ,जिल्ह्यात प्रवचना द्वारे समाजप्रबोधन ,समाजउन्नयंन व समाज पुनरुस्थापनचे महत्वपूर्ण कार्य करुन राष्ट्रसेवेचे कार्य समर्पित भावनेने करित आहेत.राज्यभर अनेक अपंग,एनजिओ,तसेच शैक्षणिक संस्थामधे सदाश्य पदाधिकारी असुन ग्राम सुधारणेचे कार्य जेस्ठ समाजसेवक,प्रवचनकार ,अपंगसेवक डॉ रविंद्र भोळे करित आहेत .समर्पित कार्याबद्दल त्याना दोनसे पन्नास इंटरनेशनल,नेशनल,स्टेट व जिल्हा स्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत,मात्र अजुनही शासन दरबारी मात्र ते दुर्लक्षित आहेत.डॉ रवींद्रभोळे ह्याना भारतभूषण नेशनल अवार्ड मिळाल्याब्द्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.