हूशश… प्रतीक्षा संपली ; उद्या दहावीचा निकाल

0
127

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 17 जून, 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि 17 जून रोजी दुपारी 1 वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे तर निकाला संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमावरून माहिती दिली आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 79 हजार 486 तर राज्यातून एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 284 ठिकाणी परीक्षा पार पडली होती.

येथे पाहा निकाल?

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here