हिंगोणा येथील आश्रय फॉउंडेशन आयोजित आरोग्य शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी घेतला लाभ

0
27

यावल : प्रतिनीधी ( सुरेश पाटील)
आश्रय फॉउंडेशन यावल -रावेर तर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधेपचार शिबिराचे आयोजन विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा येथे आश्रय फॉउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व आश्रय फॉउंडेशन पदाधिकारी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रुकसाना फिरोज तडवी या होत्या.
शिबिराचे उदघाट्न आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे हार व पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.विकास सोसायटी गाऊंड हिंगोणा ता.यावल येथे डॉ. कुंदन फेगडे, डॉ.राजेश चौधरी, डॉ. पराग पाटील, डॉ.भरत महाजन, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.प्रविण पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत भारंबे डॉ.नितीन महाजन, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भटकर, डॉ.ललित बोरोले आदी आश्रय फॉउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी मोफत रुग्ण तपासणी व औषधेपचार केले. शिबिरामध्ये एकूण ६१५ गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या प्रसंगी सरपंच रुकसाना फिरोज तडवी, आश्रय फॉउंडेशन अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, रेखाताई पाटील, जयश्री चौधरी, जयश्री पाटील, रेखा बोंडे, फिरोज तडवी, मनोज वायकोळे, महेंद्रसिंग पाटील ,ज्ञानुसिंग पाटील, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, सागर महाजन, विष्णू महाजन, ललित महाजन, सुभाष गाजरे, विजयशिंग पाटील, कुणाल कोल्हे, चंद्रकांत महाजन, व्यंकटेश बारी, डॉ.राजेश चौधरी डॉ.पराग पाटील, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.भरत महाजन, डॉ.प्रविण पाटील, डॉ.योगेश पाटील, डॉ. प्रशांत भारंबे डॉ.नितीन महाजन, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भटकर, डॉ.ललित बोरोले आदींची उपस्थित होती.
या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामध्ये एकूण ६१५ गरजू रुग्णानानी याचा लाभ घेतला यात डॉ.दिलीप भटकर, डॉ.योगेश पाटील, डॉ.भरत महाजन डॉ प्रवीण पाटील यांनी रक्तदाब, मधुमेह, थायरोईड, छातीचे विकार दम लागणे हृदयाचे विकार, वारंवार खोकला ताप येणे आदी आरोग्य तपासण्या केल्या.
डॉ.नितीन महाजन, डॉ.राजेश चौधरी, डॉ. प्रशांत जावळे (बालरोग तज्ञ् )हे लहान मुलांचे आजार डायरिया, पोटदुखणे जंत होणे,बालदमा छातीचे व हृदयाचे आजार, निमोनिया, डेंगू,सर्दी,पडसे डांग्या खोकला इ, वर आरोग्य तपासणी केली त्याच प्रमाणे डॉ.ललित बोरोले व डॉ.पराग पाटील(दंत रोग तज्ञ् )हे दात दुखणे, जबड्याला सूज येणे, तोंडाला घाण वास येणे,रूट कॅनॉल ट्रीटमेंट साठी सल्ला इ. वर आरोग्य तपासणी केली डॉ.कुंदन फेगडे व प्रशांत भारंबे (स्त्री रोग तज्ञ) यांनी पाळीसंबंधि समस्या, वंद्धत्व,गर्भपिशवीचे विकार, श्वेतपदर,प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी डॉ.गौरव धांडे (अस्थिरोग तज्ञ् )इ.आरोग्य तपासणी ही मोफत केली.
या शिबिरास अनमोल सहकार्य*डॉ.कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार, मनोज बारी हेमंत फेगडे विशाल बारी हर्षल धनगर, युवराज गाजरे, गौरव बाविस्कर, कपिल कोळी, तुषार कोळी, भगवान पाटील, हरेश भोळे, वैभव इंगळे, रोहित वारके, अनमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here