हडकाई नदी पात्रात प्लॅस्टिक मिश्रित घनकचरा ठेकेदाराच्या नावावर अधिकाऱ्यांचा घोटाळा

0
30

साईमत यावल प्रतिनिधी

नगरपरिषद हद्दीत हडकाई नदीपात्रात प्लास्टिक विलगीकरण न केलेला घनकचरा टाकून पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत दि.२५ फेब्रुवारी ,दि.७ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी जळगाव फैजपूर भाग फैजपूर उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय जळगाव यांच्याकडे यावल नगरपरिषदेने तसेच संबंधित ठेकेदाराने घाण – केर कचरा नदीपात्रात टाकून नदी,नाले स्वच्छता अभियान खड्ड्यात घातले, त्यामुळे नगरपरिषद मुख्याधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करणे बाबतचे विषयांने तसेच यावल नगरपरिषद हद्दीत हडकाई नदी पात्रात प्लास्टिक मिश्रित विलगीकरण न केलेला घनकचरा टाकून पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत तक्रार केली आहे. परंतु संबंधितांनी या प्रकरणात कागदोपत्री मोठा घोटाळा केल्याने कोणतीही कारवाई केली नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव उप प्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी मात्र १६ मार्च २०२२ रोजी तहसीलदार यावल,यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देऊन यावल नगरपरिषद हद्दीत नदीपात्रात विलगीकरण न केलेल्या घनकचरा टाकले बाबत नमूद केले आहे की,यावल शहरातील घनकचरा कुठलेही वर्गीकरण न करता हडकाई- खडकाई नदीपात्रात टाकत असून वेळोवेळी बातमी प्रसिद्ध झाल्यावर सुद्धा तसेच लेखी तक्रार करून सुद्धा प्रशासन यावल नगरपरिषद योग्य ती कारवाई करीत नसल्याबाबतची तक्रार केली आहे.तरी महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई यांची नागरिकांची सनद परिशिष्ट-४ मधील अ.क्र.६ नुसार नागरी भागातील वस्ती मधील हवा,जल, ध्वनी, घनकचरा प्रदूषणाबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार आपल्या अखत्यारीत येत असल्यामुळे आपल्या स्तरावर कार्यवाही करून सदरचा अहवाल परस्पर तक्रारदारास कळवावा व त्याची प्रत या कार्यालयास देण्यात यावी असे कळविले होते आणि आहे परंतु आजतागायत तहसीलदार यावल यांनी काहीही लेखी कळविले नसल्याने कारवाईत संशय व्यक्त केला जात आहे.

यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी मात्र समय स्वच्छता बाळगुन कागदोपत्री कारवाई करीत दि.१८एप्रिल २०२२ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांना व माहितीस्तव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव, तहसीलदार यावल, नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी, यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, यावल नगरपरिषद हद्दीत हडकाई नदी पात्रात प्लास्टीक मिश्रीत, विलगीकरण न केलेला घनकचरा टाकून पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत सुरेश जगन्नाथ पाटील (पत्रकार) यांनी आपल्या कार्यालयात तक्रार अर्ज सादर केलेला आहे. हडकाई नदी साफ सफाई करीता स्वप्नील पांडुरंग बडगुजर यांना कार्यादेशीत करून जेसीबी द्वारे काम करण्यात आली असून सोबत साफ सफाई केलली छायाचित्र जोडण्यात आली आहेत. तसेच सदर ठिकाणचा कचरा उचलण्यात आला असून घनकचरा प्रकल्प येथे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच यावल नगरपरिषदेच्या रहिवासी भागापासून दूर अंतरावर तहसील गोडावून मागे असून अज्ञात व्यक्ती मार्फत सदर कचरा टाकण्यात आलेला आढळून आला असून सदर जुना साठलेला कचरा शास्त्रोक्त प्रक्रिया करणे बाबत कृती आराखडा तयार करण्यात आला असून कृती आराखडा अन्वये त्वरीत प्रथम प्राधान्याने काम पूर्ण करण्यात येईल, असा अहवाल दिला.
अहवाल दिला असला तरी प्रत्यक्षात असे कोणतेही काम प्रत्यक्ष घटनास्थळी नदीपात्रात करण्यात आले नाही आणि आता ऐन पावसाळ्यात तेही आगस्ट महिन्यात त्या नदीपात्रातील तोच प्लास्टिक युक्त घनकचरा जेसीपी मशीन द्वारे उचलून विलगीकरण न करता घनकचरा डेपोवर टाकला जात आहे याचा अर्थ काय निघतो..? याचे आत्मपरीक्षण संबंधित अधिकाऱ्यांनी करून तात्काळ नदीपात्राचा व घनकचरा डेपोचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील कारवाई करावी अन्यथा ( फैजपूर येथील नगर परिषदेवर झालेल्या कारवाई प्रमाणे ) या पुढील कारवाईस सर्व यंत्रणा जबाबदार राहणार आहे याची नोंद घ्यावी.असे तक्रार यांनी म्हटले आहे.
यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी १८ एप्रिल २०२२ रोजी यावल तहसीलदार आणि पाटबंधारे विभाग यावल शाखा अभियंता यांना व संबंधितांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की यावल नगर परिषद हद्दीत हडकाई नदीपात्रात प्लास्टिक मिश्रित विलगीकरण न केलेला घनकचरा टाकून पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत विषयांनुसार नमूद केले आहे की,नदीपात्रातील कचरा उचलण्यात आला असून घनकचरा प्रकल्प येथे वर्गीकरण करण्यात आले आहे तसेच यावल नगरपरिषदेच्या रहिवासी भागापासून दूर अंतरावर तहसील गोडाऊन मागे असून अज्ञात व्यक्तीमार्फत सदर कचरा टाकण्यात आलेला आढळून आला असून सदर जुना साठलेला कचरा शास्त्रोक्त प्रक्रिया करणे व सदर जुना कचरा साठलेला प्रक्रिया करणे करता नगरपरिषद मालकीचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प येथे वाहतूक करणे करता परवानगी मिळावी अशी मागणी केली होती आणि आहे.
यावल नगरपरिषदेचे हे पत्र सुद्धा यावल तहसीलदार, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग यावल,नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव उप प्रादेशिक अधिकारी यांना दिलेले पत्र सुद्धा हास्यास्पद आणि मनोरंजन करणारे तसेच कागदोपत्री कारवाई करणारे स्पष्ट दिसून येत आहे कारण अनेक टन वजनाने असलेला प्लास्टिक युक्त घनकचरा अज्ञात व्यक्ती नदीपात्रात कशाला टाकणार ? आणि यावल तहसीलदार यांनी व पाटबंधारे विभागाने वाहतूक करण्याची परवानगी केव्हा आणि कशी दिली हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावल नगरपरिषद प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलक आणि प्रभारी मुख्याधिकारी निकम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई न केल्यास यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईस संपूर्ण यंत्रणा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे या प्रकरणाचे तक्रारदार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here