यावल ः तालुका प्रतिनिधी
समाज परिवर्तनाचा आधार म्हणजे राजकारण असते. मात्र, तेथेही पदोपदी मनाच्या विपरीत घटना, घडामोडी घडतात. चढ-उताराची परिस्थिती निर्माण होऊन पक्षनिष्ठा, राजकीय चारित्र्याचा कस लागतो. अशावेळी पक्षासोबत एकनिष्ठ राहून समर्पित भावनेने काम करणारे माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्यासारखे मोजके कार्यकर्ते वेगळे ठरतात, असे मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले. भालोद येथे स्व.हरिभाऊ जावळे स्मृतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.