स्व.लोकसेवक मधुकरराव चौधरींना पालमध्ये अभिवादन

0
55

रावेर ः प्रतिनिधी
राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व.लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पाल येथील सातपुडा विकास मंडळ संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. पाल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.हितेश फिरके होते.

फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शरद बिऱ्हाडे व भालोदच्या कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ. मुकेश पवार यांनी, बाळासाहेब चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ. बिऱ्हाडे यांनी स्व.चौधरी यांच्या शैक्षणिक, सामाजिक योगदानाबाबत मार्गदर्शन केले.

प्राचार्य फिरके यांनी स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या दलित, शोषित, पीडितांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक प्रा.चारुलता चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रदीप खैरे यांनी केले तर आभार प्रा.आरिफ तडवी यांनी मानले. यावेळी प्रा.सपना तडवी, राजू नाथ बाबा, आशिष जहुरे, राहुल पवार, विकास बारेला, सईद तडवी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here