बोदवड प्रतिनिधी
शहरातील टायगर गृपचे धडाडीचे पदाधिकारी असलेले रंजनसिंग राजपुत यांचे दुर्धर आजाराने तिन महिन्या अगोदर दुःखद निधन झाले. हयात असतांना प्रत्येक वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेत असत. हा वारसा निरंतर चालु राहावा यासाठी त्यांचे मोठे बंधु अजय पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२ रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
यावेळी भावनिक वातावरणात ८८ दात्यांनी रक्तदान केले. तसेच शहरातील आत्मसन्मान फाउंडेशनच्या मनोरुग्ण निवासी पुनवर्सन प्रकल्पाला मध्ये अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी फोनद्वारे आमदार चंद्रकांत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी खेवलकर , टायगर गृपचे अध्यक्ष तानाजी जाधव,राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांनी संवादातून कार्यक्रमाची प्रशंसा करीत भावपूर्ण श्रद्धांजली दिली.पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ , नगराध्यक्ष आनंदा पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके,सागर सपके , गौरव उमाप यांनी भेट दिली.
यावेळी संदिप मिलांदे , अजय पाटील,रोहित छपरीबन, राजू सोनवणे , कालु गायकवाड, अप्पु सारवान, भैय्या देशमुख , विलास माळी , राहुल शर्मा , गजानन भोंडेकर, गजानन पाटील, हर्षल चौधरी , विनोद सोनार, अमोल व्यवहारे , गजु राणा , मनोज राजपुत , अक्षय माळी , अक्षय गंगातीरे , विजय डोखे , विकास पाटील यांच्यासहित अन्य जण उपस्थित होते. कार्यक्रमाला रेड प्लस ब्लड बँकेचे डाॅ.जी.आर.भोळे , अमोल शेलार , निलेश गोंधडे, दिपक पाटील, प्रमोद पाटील, सलमान पटेल आदी कर्मचारी उपस्थित होते.