जळगाव (प्रतिनिधी)
स्वाती गुप्ता, इंदौर यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
स्वाती गुप्ता यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेंतर्गत फिजिक्स मध्ये ‘इनव्हेस्टिगेशन ऑफ नॅनोपोरस लो-के डायइलेक्ट्रीक थिन फिल्म’ या विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इलेट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. ए.एम.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कबचौउमवि,जळगाव विद्यापीठात शोधनिबंध सादर केला. त्यांच्या यशाबद्दल कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.डी.एस.दलाल यांनी अभिनंदन केले आहे.