साईमत मलकापूर प्रतिनिधी
केंद्र सरकारने नविन अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात आणला व हा कायदा सक्तीने लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकारी या कायद्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे अपंगांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अपंग जनता दल सामाजिक संघटना स्वातंत्र दिन १५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयावर अपंगांचे सामुहिक आत्मदहन आंदोलन करणार आहे.
अपंगांना जलद गतीने न्याय व हक्क मिळावा म्हणून केंद्र सरकारने नविन अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात आणला व हा कायदा सक्तीने लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु अमरावती विभागात हा कायदा फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येते. स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकारी या कायद्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे अपंगांना न्याय मिळत नाही. दोन वर्षापासून अपंगांना न्याय व योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले व आंदोलने सुध्दा केली. तरी कुंभकर्ण सारखे झोपी गेलेले अधिकारी जागे होत नाही आहे. यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यसचिव कलिम शेख (बुलढाणा) यांच्या नेतृत्वात स्वातंत्रदिन १५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयावर अमरावती विभागातील 11 मागण्यासाठी १० अपंगांचे सामुहिक आत्मदहन आंदोलन करणार असून याची जबाबदारी प्रशासन ची राहील असे निवेदन मयूर मेश्राम, करामत शाह, दीपक जाधव, जयकुमार राठोड, मसूद शेख, धनश्री पटोकार, कांचन कुकडे, प्रमोद शेबे, अमोल विटीवले याची दिले आहे.