जळगाव ः प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या माध्यमातून स्त्री संसाधन केंद्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मनपा क्षेत्रात सात सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून योजनेसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
स्त्री संसाधन केंद्र योजनेच्या समिती अध्यक्षपदी मनपाचे अतिरीक्त आयुक्त श्याम गोसावी, सदस्यपदी नागरी समाज संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवेदिता सुनिल ताठे, मनिषा किशोर पाटील, मराठी प्रतिष्ठानचे ॲड. जमील देशपांडे, फिरोज रफिक शेख, आर्या फाउंडेशनच्या छाया रविंद्र पाटील, सदस्य सचिवपदी महिला व बालकल्याण विभागाच्या अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड आयुक्त विद्या गायकवाड यांनी केली आहे.


