जळगाव : प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा हौशी रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे के. डी. गावित सैनिकी विद्यालय पथराई येथे स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. त्यात जळगावच्या एकलव्य स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली.
सोहम कोशेटीने खुल्या गटात रेस वन व रेस टू सुवर्णपदक, आर्यन सोनवणे रेस वन सुवर्णपदक व रेस टू रजत पदक, 14 वर्षे वयोगटात रोहित पाटील रेस वन व रेस टू सुवर्णपदक, 15 वर्षे वयोगटात अर्णव राजकुळे रेस वन व रेस टू कांस्यपदक, 11 वर्षे वयोगटात जितेश शर्मा रेस वन कांस्यपदक, 12 वर्षेे वयोगटात आर्या भालेराव रेस वन व रेस टू कांस्यपदक, 12 वर्षे वयोगटात गीतिका येवले रेस वन व रेस टू कांस्यपदक, 13 वर्षे वयोगटात अन्विता पाटील अंडर इलेव्हन सुवर्णपदक, 11 वर्षे वयोगटात गौरी पिंगळे रेस वन व रेस टू सुवर्णपदक पटकावले. त्यांना एकलव्य क्रीडासंकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकरांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशिक्षक प्रा. डॉ. रणजीत पाटील, सहाय्यक प्रशिक्षक रीना पाटील व गौरव शिरसाळे यांनी प्रशिक्षण दिले. केसीई सोसायटी अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, केसीई सोसायटीचे संचालक चारुदत्त गोखले, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी खेळाडूंचे कौतुक केलेे.
