विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
येथील शेंदुर्णी रोडवरील ह. भ. प.सदगुरु नाईक दादा गुरुजी मंदिर येथे त्याचें भक्त सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक एकनाथ सोनाजी आगे, सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन एम आर नाईक नाना व विजय अहिरे यांच्या सहकार्याने आर ओ फिल्टर शुद्ध व शीतल पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचे आज (दि ३०) उदघाटन प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक मधुकर आहिरे गुरुजी,प्रल्हाद चौधरी,प्रमोद पाटील,प्रकाश बोर्डे ,पंडित काकडे,कडुबा मानकर,शिवाजी चौधरी,सारंग बागले, किशोर पाटील, छोटू चौधरी शांताराम चौधरी,गोलू आहिरे, सुकलाल परदेशीं आदिसह भक्त मंडळ उपस्थित होते.