विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव पोलीस ठाण्याला आता नवीन वाहन मिळाल्याने नादुरुस्त वाहना अभावी आता पोलिसांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ येणार नसल्याने आता सोयगाव पोलिसिंग सुसाट होणार आहे.त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला गतीही मिळेल असा विश्वास पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.
सोयगाव पोलीस ठाण्याचे जुनाट आणि जीर्ण झालेले नादुरुस्त वाहनावर सोयगाव पोलीस ठाण्यातील ५२ गावांचा भार अवलंबून होता,परंतु सदरील वाहन नादुरुस्त असल्याने जुनाट आणि जीर्ण झालेल्या वाहनामुळे सोयगाव पोलिसांना आरोपींचा पाठलाग आणि रात्रीच्या गस्तीत मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या परंतु आता नवीन वाहन मिळाल्याने सोयगाव पोलिसिंग सुसाट होणार आहे.
आता रस्त्यांची अडचण पोलिसांना डोकेदुखी ठरणार
नवीन वाहन मिळाल्यावर आता सोयगाव हद्दीत गस्त घालतांना सोयगाव ते बनोटी रस्त्यांची झालेली चाळणी आता सोयगाव पोलिसांची डोकेदुखी ठरणार आहे मात्र नवीन मिळालेले वाहन हे महिंद्रा कंपनीचे असल्याने या वाहनातून खराब रस्त्यावरून प्रवास करतांना फारसा त्रास होणार नसल्याने सोयगाव पोलीस मात्र सुसाट झाले आहे.