सोयगाव पं.स.अधिकारी कर्मचारी निवासस्थानाचे मंत्री अब्दुल सत्तारांच्या हस्ते भूमिपूजन

0
10

साईमत सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी नवीन टाईप 1,3,4 व टाईप 2 या निवासस्थान बांधकामाच्या 20 कोटी 68 लाख रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवार दि ११रोजी अल्पसंख्याक विकास,औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, सोयगाव शहरातील पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी नवीन निवासस्थान व्हावे कारण जुने निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे अशी मागणी अधिकारी-कर्मचारी यांनी केली होती. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवीन निवासस्थान व्हावे यासाठी राज्य शासनाने टाईप 1,3,4 निवासस्थान बांधकामासाठी 9 कोटी 85 लाख,तर टाईप 2 निवासस्थान बांधकामासाठी 10 कोटी 83 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.सदरील निवासस्थानचे काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत करण्याच्या सूचना ना. अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष आशाबी तडवी, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, शहरप्रमुख संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, दारासिंग चव्हाण, वाय.टी. महाराज, बाबू चव्हाण, सलीम पठाण, नितीन बोरसे, कुणाल राजपूत, श्रीराम चौधरी, समाधान तायडे, नगरसेवक हर्षल काळे, भगवान जोहरे, गजानन कुडके, संदीप सुरडकर,अशोक खेडकर, कदीर शहा, राजू दुतोंडे, शेख रउफ, अक्षय इंगळे, किशोर मापारी, लतीफ शहा, मोतीराम पंडीत, दिलीप देसाई, रमेश गव्हांडे, शेख अकिल, योगेश पाटील, इलियास पठाण, मेघराज राठोड, सिराज पठाण, भरत राठोड, सांडू राठोड, नारायण राठोड, सुधाकर चौधरी, दत्तू भिका अप्पा, संजय आगे, फेरोज पठाण, श्रावण राठोड, हिरा राठोड, राधेश्याम जाधव, सुरेश चव्हाण, गटविकास अधिकारी अहिरे, सा.बां.अभियंता टाकसाळ आदींची उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here