सोयगांव प्रतिनिधी
आठवडाभरापासून मृग नक्षत्र कोरडे जात असतांना रविवारी भूर- भूर झालेल्या पावसावर सोयगाव तालुक्यात मृग नक्षत्राचा पहिला दिवस उजाडला होता.जिल्ह्यात पावसाच्या सरींवर सरी कोसळत असतांना मात्र सोयगाव तालुका कोरडा ठाक झाला होता . रविवारी झालेल्या भूर – भूर पावसामुळे तहानलेल्या जमिनीचा घसा कोरडाच राहिला आहे . मात्र वातावरणाने दिलासा दिला असल्याचे वातावरण सोयगाव तालुक्यात निर्माण झाले आहे .
मृग नक्षत्रात आठवडाभरापासून खंड दिल्याने खरिपाच्या पेरण्यांची तयारीही खोळंबली होती सोयगाव तालुक्यात आठवडाभराचा खंड यामुळे मशागत झालेल्या जमिनींवरील ताण वाढला होता तर दुसरीकडे बियाणे घरात आणून आठवडा झाला परंतु अद्यापही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत मशागतीच्या कामात व्यस्त झाले होते रविवारी भूर भूर पावसाने मृगाच्या पावसाने खाते उघडले परंतु झालेला पावूस समाधानकारक नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे . सोयगाव तालुक्यात एक जून पासून खरिपाच्या मशागतींच्या कामांनी वेग घेतला आहे परंतु अद्यापही मोठा पावूस न झाल्याने शेतकऱ्यांची डोळे आकाशाकडे लागून आहे .