विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
तालुक्यातील पळसखेडा येथे जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकार भगवान महावीर याची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात साजरी करण्यात आली यावेळी सर्व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जैन स्थानक येथून पारंपारिक पद्धतीने बैलगाडीवर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली हनुमान मंदिर मार्गे ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व समाज बांधवांनी तर्फे भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन महिलांन तर्फे ग्रामपंचायत कार्यालय पळासखेडा येथे करण्यात आले त्याच बरोबर आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्याच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन सर्व समाज बांधवांना तर्फे करण्यात आले.
महावीर जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यानिमित्ताने पळसखेडा ग्रामपंचायत येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते त्याची देखील सुरुवात यावेळी करण्यात आली सर्वप्रथम राजु रेकनोद , पांडुरंग थोरात , अशोक बोराडे , सुनील जैन , कैलास माळी,यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिराला सुरुवात केली.
संपूर्ण गावातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून पुन्हा जैन स्थानक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी हिरालाल जैन, इंदरचंद जैन ,शंकरलाल जैन कचरूलाल जैन ,पंकज जैन, मनोज जैन, विजय शर्मा ,गजानन शर्मा, मुकेश जैन ,रामदास वानखेडे, मधुकर थोरात, श्रीरंग खंडाळकर, रुद्राआप्पा बेलपत्रे तसेच गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते