विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव शहरातील जुना बाजार चौक भागातील कुलूपबंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा शनिवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११.वाजता जबरी चोरी केली होती या मध्ये ७० हजार रुपयांचे दागीने व रोख रक्कम ३० हजार असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.
कुटुंबातील सर्व सदस्य लग्नासाठी आळंद ता. सिल्लोड तेथे गेल्यामुळे जुना चौक भागात राहणारे युनूस तुराब शहा यांच्या कुलूप तोडून व कोंडा तोडुन चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती याबाबत रमजान युनूस शहा यांनी सोयगाव ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता सोयगाव पोलीस सहायक निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून शेंदुर्णी ता.जामनेर येथून सोमवार दि.६. रोजी एकास अटक केली असून चोरी बाबत पुढील तपास सुरू आहे पुढील तपास पोलीस सहायक निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ज्ञानेश्वर सरताळे, राजू बरडे, सादिक तडवी, रवी तायडे, आदी करीत आहे.