विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी
छायाचित्रओळी-सोयगाव घरफोडी प्रकरणातील आरोपींना पोलिसांसोबत,दुसऱ्या छायाचित्रात आरोपींकडून हस्तगत केलेले कुलूप तोडीचे साहित्य.
सोयगाव शहरातील जुना बाजार चौकात भरदिवसा झालेल्या जबरी घरफोडीत पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करून मंगळवारीही दुसरा आरोपी सराफा दुकानदार यास मंगळवारी शिताफीने अटक केली असून दोघांना मंगळवारी सोयगाव न्यायालयासमोर हजे केले असता,त्यांना गुरुवारपर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरम्यान सोयगाव घरफोडी प्रकरणाचे धागेदोरे शेंदुर्णी ता.जामनेर येथेच आढळून आल्याने सोयगावात खळबळ उडाली आहे.सोयगाव शहारापासून हाकेच्या अंतरावर शेंदुर्णी हे मोठे बाजारपेठ म्हणून गाव आहे याच गावात सोयगाव शहरातील जबरी घरफोडीचे धागेदोरे सोयगाव पोलिसांना हाती आले आहे.
शेंदुर्णी ता,जामनेर गावातून सोमवारी संदीप गुजर यास पोलिसांनी अटक केल्यावर मात्र या चोरट्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या शेंदुर्णी येथील पारस ज्वलर्स चे मालक परेश ईश्वरलाल जैन रा. होळी मैदान शेंदुर्णी ता. जामनेर जि जळगाव यांना विक्री केलेले आहे.त्यावरून आम्ही शेंदुर्णी येथे येऊन परेश जैन यांना संदीप गुजर याने चोरीचे दागिने तुम्हाला विक्री केलेले आहे का? त्यावर परेश जैन यांनी चोरीचे सोन्याचे दागिने संदीप गुजर याचेकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याने गुन्ह्यातील दागिने गुन्ह्यात जप्त करून परेश जैन यांना गुन्ह्यात अधिक विचारपूस केली असता गुन्ह्याचे अधिक तपासकामी परेश जैन यांना अटक करण्यात आली आहे.त्यामुळे सोयगाव घरफोडीचे पाळेमुळे आता शेंदुर्णी आणि नेरी या जामनेर तालुक्यातील दोन्ही गावात आढळून आले आहे.त्यामुळे सोयगाव पोलिसांच्या गतिमान तपासामुळे या जबरी घरफोडीच्या गुन्ह्यात शेंदुर्णी ता.जामनेर येथील दोन आरोपींना अटक करून मंगळवारी सोयगाव न्यायालयासमोर हजे केले असता त्यांना तीन दिवस गुरुवार दि.०९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
—असा लावला तपास—
सोयगाव पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी तातडीने दोन पथके तैनात करून तपासाचे चक्रे जलद गतीने फिरविली, घटना स्थळावर जाऊन घटनास्थळाचे आजूबाजूचे लोकांचे म्हणणे तसेच संशयित आरोपीचे वर्णन याची नोंदी घेऊन शेंदुर्णी, गलवाडा रोड, सोयगांव मेन रोड वरील सर्व सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक केली असता साक्षीदार यांचे म्हणणे प्रमाणे एक पिवळ्या रंगाची scooty निष्पन्न झाल्याने रात्री अपरात्री तपास पथक यांनी आरोपीचा दोन दिवस शेंदुर्णी येथे शोध घेतला असता तो मेन मार्केट शेंदुर्णी येथे संशयित इसम नाव संदीप अर्जुन गुजर वय 36 वर्ष रा शेंदुर्णी ता जामनेर जि जळगाव हा मिळून आल्याने त्यास तपास कामी ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन नमूद गुन्ह्याचे दृष्टीने विचारपूस केली असता त्याने नमूद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे जवळ असलेलीपिवळ्या रंगाची हिरो कंपनीची scooty जप्त केली तसेच scooty ची झडती घेतली असता त्यामध्ये घरफोडी करण्याचे हत्यार मिळून आल्याने ते पण जप्त करण्यात आलेआहे त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल बाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल सोन्याचे दागिनेकाडून देतो तुम्ही माझ्यासोबत चला त्यावरून पोलीस संदीप गुजर याचे सांगणेवरून नेरी येथे घेऊन गेला तेथे आरोपीने घुमजाव करून सदर चोरीचे दागिने शेंदुर्णी येथील पारस ज्वलर्स चे मालक परेश ईश्वर लाल जैन रा. होळी मैदान शेंदुर्णी ता. जामनेर जि जळगाव यांना विक्री केलेले आहे.त्यावरून आम्ही शेंदुर्णी येथे येऊन परेश जैन यांना संदीप गुजर याने चोरीचे दागिने तुम्हाला विक्री केलेले आहे का? त्यावर परेश जैन यांनी चोरीचे सोन्याचे दागिने संदीप गुजर याचेकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याने गुन्ह्यातील दागिने गुन्ह्यात जप्त करून परेश जैन यांना गुन्ह्यात अधिक विचारपूस केली असता गुन्ह्याचे अधिक तपासकामी परेश जैन यांना अटक करण्यात आली नमूद दोन्ही आरोपी यांना मुदतीत मा. प्रथम वर्ग न्यायदंडधिकार साहेब सोयगाव यांचे समक्ष हजर केले असता ब्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,उपविभागीय अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोना ज्ञानेश्वर सरताळे, राजू बरडे, सादिक तडवी, सागर गायकवाड, रवी तायडे आदी करीत आहोत.