सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा

0
16

सोयगाव : प्रतिनिधी विजय चौधरी 

एक लाख तेरा हजार रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्या बाबतचे निर्देश आरोग्य संचालनालय यांनी शुक्रवारी दिले आहे त्यामुळे आता तालुकावासियांच्या आरोग्य सेवेसाठीच्या जळगाव,औरंगाबाद खेट्या थांबणार आहे.सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्याने सोयगाववासीयांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे.
मागासलेल्या आणि अतिदुर्लाक्षित सोयगाव तालुका आरोग्य सेवेपासून वंचित राहिलेला होता.आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील ८६ खेड्यातील नागरिकांना अतिदक्षतेच्या आणि गंभीर आजाराच्या निदानासाठी जळगाव आणि औरंगाबाद खेट्या माराव्या लागत होत्या परंतु सोयगाव तालुका प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या मागणीचा आरोग्य संचालनालय यांनी विचार करून राज्यातील विशेष बाब म्हणून सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा बहाल करून त्यासाठी मंजुरी दिली आहे.
मोडकळीस आली होती इमारत
सोयगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्याने तब्बल पाच वर्षापासून हि रुग्णालयाची इमारत सलाईनवर होती परंतु आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने या इमारतीचेही भाग्य उजळणार असून या ठिकाणी असलेल्या गैरसोयींना आळा बसेल त्यामुळे तालुकावासीयांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल,या मंजुरीमुळे सोयगाव कराच्या आरोग्याने सुटकेचा श्वास घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here