सोयगाव : प्रतिनिधी
शेतकरी सन्मान योजनेसाठी लाभार्थ्यांना संचिका ऑनलाईन करण्यासाठी सोयगाव तालुक्यात सन्मान योजनेचे पोर्टलच बंद असल्याने नवीन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन करण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहे.
सोयगाव तालुक्यात शेतकरी सन्मान योजनेची संकेतस्थळ बंद असल्याने नव्याने संचिका ऑनलाईन करणाऱ्या शेताकायांना मोठ्या अडचणी होत असून केंद्र शासनाची महत्वाकांक्षी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी पोर्टलच बंद असल्याने डोक्याला हात लावून बसावे लागत आहे. कृषी विभागाने या योजनेच्या बाबतीत हात वर केले असल्याने शेतकऱ्यांना संचिका ऑनलाईन करण्यासाठी गाव पातळी वरून ते तालुकास्तरावर पायपीट करावी लागत असून तालुका कृषी विभाग मात्र शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे जाण्याचा उपदेश देत आहे. तर महसूल विभाग संकेतस्थळ बंद असलाचे उत्तर देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे.
शेतकरी सन्मान योजनेच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी आपला वेळ खर्च करू पाहत नसून महसूल विभागात मात्र संकेतस्थळ बंद असल्याचे उत्तर देण्यात येत आहे.त्यामुळे नवीन लाभार्थी शेतकऱ्यांची फरफट होत आहे.
शेतकरी सन्मान योजनेसाठी तालुका स्तरीय लॉगीन आय डी तातडीने सुरु करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे.जिल्ह्यात २९२ युझर आय डी कार्यान्वित करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
—————————-