‘सुस्वागतं रामराज्यं’ने पाडव्याची सायंकाळ रंगली

0
27

जळगाव ः प्रतिनिधी
स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित ‘सुस्वागतं रामराज्यं’ या सुंदर नृत्य-नाटिकेद्वारे गुढीपाडव्याची सायंकाळ रंगली. नर्तन-कीर्तनाच्या सुरेल संगमाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
डॉ. भवरलाल व कांताबाई फाउंडेशनच्या सहकार्याने  छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. सराफा व्यावसायिक अशोक जोशी, राम मंदिर संस्थानचे गादीपती श्रीराम जोशी, जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अनिल जोशी, नृत्य नाटिका सादरकर्ते अक्षय आयरे, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरद छापेकर, दीपक चांदोरकर उपस्थित होते. अशोक जोशी, श्रीपाद जोशी, जैन इरिगेशनचे व्ही.एम. भट,डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते गुढी देऊन कलावंतांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
गीत रामायण कीर्तन आणि नर्तन, या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत श्रोत्यांना आनंद देऊन गेले. ‘भरत नृत्यम्‌’ ही नाट्यशास्त्रावर आधारित मार्गी नृत्यशैली रसिकांनी अनुभवी. दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्याची जोड असे आगळेवेगळे स्वरूप रसिकांना मोहिनी घातली. सूत्रसंचालन दीपिका चांदोरकर यांनी केले.
 या कलाकारांचा समावेश
गीतरामायण अक्षय आयरे यांच्या संकल्पित व दिग्दर्शित केले असून, त्यांच्यासह पूजा भुर्के, लतिका पाटील, सनया बारस्कर, जान्हवी चारी, लाश्‍या पंडा, नम्रता शर्मा, मेधावी शर्मा, दिव्यश्री शर्मा, जाह्नवी तन्ना, आध्या भटनागर, चैताली शेट्टी , देवश्री गंभीर, साक्षी अय्यर, रुची बागवे, रुचिरा निंबरे, नेहा भोसले, स्नेहा वडके, स्नेहल तन्ना या शिष्यांचाही या सादरीकरणात समावेश होता. तांत्रिक सहाय्य, प्रकाश योजना रिमा आयरे आणि संगीत ध्वनिफीत रमेश आयरे यांनी केले. आयोजन समितीने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here