सुनसगाव गावातील पेपर मिलला आग

0
22

जळगाव : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या सुनसगाव शिवारातील शक्ती पेपर मिलला आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.

सविस्तर वृत्त असे की, सुनासगाव शिवारातील शक्ती पेपेर मिल ही चुडामण सरोदे व शशिकांत वाघूळदे यांच्या मालकीची कंपनी आहे.या मिलला सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यांनतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलास ११.४५ मिनिटांनी फोनद्वारे कळविण्यात आले असता अग्निशमन दलाचे बंब तत्काळ रवाना झालेत. यावेळी वाहन चालक वसंत न्हावी, भरत बारी, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांच्या पथकाने 2 बंब वापरून ही आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी समोर असलेल्या सुदर्शन पेपर मिलमधून या बंबाना पाणीपुरवठा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here