सावदा,. प्रतिनिधी । वाढता कोरोना संसर्ग व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता 15 ते 18 वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला शहरात सुरूवात करण्यात आली. सावदा शहरात (sawada city) हे लसीकरण (coronavirus vaccine) सुरू करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी (suraj pardesi) यांनी केली होती व या मागणीला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सावद्यात लसीकरणामुळे समाधान
सावदा हे तालुक्यातील मोठे शहर असल्याने 15 ते 18 वयोगटातील युवकांचे लसीकरण येथे देखील होणे आवश्यक असल्याने ते त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शिवसेना सावदा शहरप्रमुख सुरज परदेशी यांनी आमदार चंद्रकांत पाटील व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती. सावदा ग्रामीण रुग्णालयात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण (coronavirus vaccine) सुरू झाले असून 15 ते 18 वयोगटातील युवकांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी यांनी केले आहे.