कजगाव प्रतीनिधी आमीन पिंजारी
कजगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या सावदे गावचे सुपुत्र माननीय श्री मनोहर नामदेव देसले हे C R P F मध्ये हवलदार या पदावर गडचिरोली येथे लष्कर मध्ये 24 वर्ष भारत मातेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होऊन प्रथमच कजगाव येथे आल्याने शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन यांच्या वतीने व पाचपावली माता नगर कजगाव यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले , व त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कजगाव येथील शिवसेना कार्यालयात अनिल महाजन , राष्ट्रीय चर्मकार समाजाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष उत्तम मोरे , हर्षल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, खलील मन्यार, रमेश बैरागी, श्याम सोनार , अविनाश वाघ , भागवत चौधरी , सुनिल पवार, स्वप्नील महाजन, आदी ग्रामस्थांनी भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.